August 17, 2012

संस्कृत सुभाषिते [अर्थासकट]

Subhashite_Milind Divekar


जलबिंदूनिपातेन क्रमशः पूर्यते घटः |
स हेतुः सर्वविद्याना धर्मस्य च धनस्य च ||
अर्थ ›› पाण्याच्या थेंबाथेंबाने हळूहळू घट भरतो त्याचप्रमाणे सर्व विद्या, धर्म आणि धनाच्या बाबतीत आहे. 

 आणि हेच तत्व संग्रहाच्या बाबतीत पण लागू ठरते. संस्कृत भाषा, जी आपल्याला आपली परंपरा शिकवते, आपली संस्कृती शिकवते तीच भाषा आजच्या युगात लोप पावत आहे. संस्कृत भाषेनी आपल्याला अनेक रचना दिल्यात ज्याच्या फलस्वरूप अनेक पौराणिक ग्रंथ तयार झाले. तशीच अनेक सुभाषिते हि दिली. असाच एक संस्कृत ब्लॉग पण समजेल अश्या मराठी भाषेत मिलिंद दिवेकर ह्यांनी सादर केला आहे. संस्कृत सुभाषिते [अर्थासकट] संस्कृत आणि मराठी ह्या दोन भाषेंचा संगम ह्या ब्लॉग वाचताना अनुभवता यईल.

August 16, 2012

खगोल विश्व

khagolvishwa_Sagar Bhandare


संपूर्ण मानवसृष्टी पृथ्वीवर वसलेली आहे. पृथ्वी जीवसृष्टीच्या विकासातील एक महत्वाचा घटक तर आहेच, पण ह्या शिवाय आपल्या सूर्यमालिकेतील सूर्य, चंद्र, शुक्र, बुध आणि इतर ग्रह, तारे, उपग्रह इ. सृष्टी निर्मितीचे बांधील घटक आहेत, म्हणजेच ह्या सर्वांचा एकत्रित प्रभाव हा आपल्या मानवीय जीवसृष्टीवर होत असतो. हे खगोलशास्त्राद्वारे आपण जाणून घेऊ शकतो. असाच एक खगोल विश्वावर शास्त्रीय दृष्टीकोनातून प्रकाशझोत टाकणारा, सागर भंडारे ह्यांचा ब्लॉग खगोल विश्व.

August 15, 2012

भारतीय स्वतंत्रता दिवस

भारतीय स्वतंत्रता दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा... जय हिंद
 
 जन-गण-मन अधिनायक जय हे,
भारत-भाग्य-विधाता ।
पंजाब सिन्धु गुजरात मराठा,

August 14, 2012

अग्निसखा

Agnisakha_Kranti


फिनिक्स, एक असा पक्षी जो त्या तेजस्वी सुर्यावर प्रेम करतो आणि आकाशात झेप घेतो, उंच..उंच.. अजून उंच.. पण सूर्याच्या प्रखर तेजाची झळ त्याचे नाजूक पंख सोसू शकत नाही. ज्याच्या सहाय्याने आज तो इतक्या उंच पोहोचला होता, त्याच पंखांच्या राखेत निपचित पडून राहतो हा. वाट पाहतो, पुन्हा आकाशात क्षेप घेण्याची. स्वतःच्या पंखाच्या राखेतून पुन्हा आसमंतात झेपावणारा हा अग्निसखा आणि तसाच क्रांती ह्यांचा कवितांचा ब्लॉग अग्निसखा. एक आशावादी, उत्स्फुर्त ब्लॉग.

August 13, 2012

मराठी संगीत प्रेमी

Marathi Sangeet Premi_Sagar


संगीत.., माणसाच्या जीवनातला एक अविभाज्य घटक. मग ते चित्रपट-संगीत असो किंवा एखाद्या album मधील असो, संगीताची दुनिया आपल्यला नेहमीच मोहून घेते. काळ बदलला तसे संगीतही बदलले. नव्या युगासोबत जाताना नवीन संगीताशी गट्टी करायला हवी, नाही का? त्यासाठी  मराठी संगीत प्रेमी हा ब्लॉग घेऊन सागर येत आहेत नव्या युगातील नवीन संगीताचा नजराणा, खास संगीत प्रेमींसाठी.

August 10, 2012

Calligraphic Expressions....

Calligraphic Expression_B.G.Limaye


अक्षरांचे भाव अचूक टिपणं हि देखील एक कला आहे. प्रत्येक अक्षराचा एक भाव असतो. त्या अक्षराचा भाव समजून निर्माण होते ती अक्षराची भावना. आणि मग काय, अक्षरेच बोलू लागतात आपल्याशी. कविता, उतारे ह्यांच्या साक्षीने साकारलेली, त्या अक्षरांमधल्या वेगवेगळ्या भावनांची लयबद्ध मांडणी श्री. लिमये ह्यांच्या Calligraphic Expressions...by B G Limaye ह्या ब्लॉग मधून दिसते.

August 09, 2012

अर्पण (श्री दत्तगुरू)

Arpan_Shri Dattaguru


|| ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभय नमः ||

आज गुरुवार, श्री दत्तगुरूंच्या कृपेनी सुरु झालेला हा मराठी ब्लॉग अर्पण, दत्तभक्तांसाठी एक पर्वणीच ठरू शकेल. दत्तगुरूंच्या अनेक लीलांचे दर्शन शब्दरूपानी ह्या ब्लॉगवर संग्रहित केलेले आहे.

August 08, 2012

चेहरे

Chehre_Jagdish Bhavsar


चेहरे शब्द बनून बोलतात.. काय? खरं वाटत नाही? खरंच, चेहरे शब्द बनून बोलतात.. 
चेहरे हा अर्कचित्र असलेला ब्लॉग जगदीश अशोक भावसार ह्यांनी साकारला आहे.

August 07, 2012

पु.ल.प्रेम


Pula Prem_Deepak


व्यथा असो आनंद असू दे
प्रकाश  किंवा तिमिर असू दे

August 06, 2012

पोलिसनामा

Policenama_Vijaysinha Holam


समाजामध्ये वाढत असलेले गुन्हे, गुन्हेगार ह्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक महत्वाची कडी असते पोलीस-यंत्रणा. वेळोवेळी वृतपत्र, संगणक, दूरदर्शन माध्यमातून अनेक माहिती-साधने आपल्याला ह्या पोलीस-यंत्रणेशी आमने-सामने करून देतातच. हि झाली नाण्याची एक बाजू, पण ह्याच नाण्याची दुसरी बाजू, जी आपल्या समोर क्वचितच येते तीच बाजू विजयसिंह होलम ह्यांच्या पोलिसनामा ह्या ब्लॉगमधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

August 03, 2012

मोगरा फुलला

Mogara Phulala_Marathi Katha Blog


कथा ह्या माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक म्हंटला तर अतिशोयोक्ती होणार नाही, कदाचित.. कारण एक काळ होता, जेव्हा pocket - money  मधले पैसे वाचवून लायब्ररी लावायची आणि कथा- कादंबऱ्या पिजून काढायच्या. कधी पौराणिक, कधी सामाजिक, कधी suspense- thrill. ह्याच कथा आपल्याला घडवत असतात. कथा - कादंबरी मध्ये वाचलेले नायक, नायिका, इतर पात्र इतकच काय पण काही प्रसंग हि आपल्याला आपलेसे करणारा हा ललित साहित्याचा एक प्रकार आहे. मग अश्या कथा - कादंबरी ह्या ई - युगात कुठे ? असा प्रश्न आपल्याला सहज पडू शकतो. पण नाही, कांचन कराई ह्यांचा मोगरा फुलला हा ब्लॉग कथाप्रेमी वाचकांसाठी कथासंग्रह उपलब्ध करतो. 

August 02, 2012

बालभारती - मराठी कविता
आनंदी आनंद गडे,
इकडे-तिकडे चोहीकडे... 
अ अ आई , म म मका 
मी तुझा मामा , दे मला मुका...

आठवलं.. ?? बालभारती ह्या पुस्तकातली एक कविता. हि आणि अश्या अनेक कविता आपल्याला पुन्हा मागे नेतात, त्या बालपणीच्या रम्य जगात. ह्या कवितांशी जडलेलं आपलं शालेय नातं आठवल्याखेरीज राहत नाही. त्या कविता पाठ करणे, पाठ  करता करता चुकणे,  इतकाच काय तर त्या कविता पाठ होत नाही म्हणून खाल्लेले धम्मक लाडू देखील आठवतात. आपले ते बालपणीचे हरवलेले क्षण सुरेश शिरोडकर ह्यांच्या  बालभारती - मराठी कविता  ह्या ब्लॉगने जपण्याचा सुंदर प्रयास केला आहे.

August 01, 2012

क्षितिज जसें दिसतें

Kshitij jase diste :: Kaushal Inamdar


क्षितिज जसें दिसतें तशी म्हणावी गाणी...  
एक अतिशय सुंदर आणि लयबद्ध शब्दांची मैफिल, असावी असा हा ब्लॉग आहे. कौशल. श्री. इनामदार ह्यांच्या विचारातून प्रकटलेली हि शब्दरचना आहे. संगीतक्षेत्रातल्या वाटचाली सोबत स्वतः अनुभवलेल्या क्षणांचे उत्तम सादरीकरणाची हा ब्लॉग साक्ष देतो.