कथा ह्या माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक म्हंटला तर अतिशोयोक्ती होणार नाही, कदाचित.. कारण एक काळ होता, जेव्हा pocket - money मधले पैसे वाचवून लायब्ररी लावायची आणि कथा- कादंबऱ्या पिजून काढायच्या. कधी पौराणिक, कधी सामाजिक, कधी suspense- thrill. ह्याच कथा आपल्याला घडवत असतात. कथा - कादंबरी मध्ये वाचलेले नायक, नायिका, इतर पात्र इतकच काय पण काही प्रसंग हि आपल्याला आपलेसे करणारा हा ललित साहित्याचा एक प्रकार आहे. मग अश्या कथा - कादंबरी ह्या ई - युगात कुठे ? असा प्रश्न आपल्याला सहज पडू शकतो. पण नाही, कांचन कराई ह्यांचा मोगरा फुलला हा ब्लॉग कथाप्रेमी वाचकांसाठी कथासंग्रह उपलब्ध करतो.
ब्लॉगचे वैशिष्ठे -
- 2008 साली सुरु झालेला हा ब्लॉग कराई ह्यांच्या कथालेखानानी सुसज्जित झाला आहे.
- कथा- कादंबर्यांचा दर्जेदार ठेवा त्यांच्या ब्लोग मधील कथांतून दिसतो.
- मोगरा फुलला वाचकांना विविध वर्गावारीतल्या कथांचे संग्रह उपलब्ध करून देतो. जसे,
- कौटुंबिक आणि सामाजिक.
- रहस्य आणि अद्भुतकथा.
- भयकथा.
- प्रेमकथा.
- विनोदीकथा.
- वेगवेगळ्या कथावर्गतील जवळजवळ 6 कथा ह्या ब्लोगद्वारा प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.
- ब्लॉग संकेतस्थळ काही कारणाने हलविण्यात आले आहे. तरी index लिंक वर click करून कथांची वर्गवारी दिसते.
- कथांचे मुखपृष्ठ कथांना समर्पक असेच आहेत.
ब्लॉग लेखक/ लेखिका - कांचन कराई.
ब्लॉग अधिकृत URL - http://www.mogaraaphulalaa.com
ब्लोग उत्तम असला तरी काही हलक्या त्रुटी अवश्य आहेत.
- ब्लॉग वर अपेक्षित links सापडण्यास अडचणी येऊ शकतात.
- Archive मधील links ची व्यवस्था अजून उत्तम पद्धतीने होऊ शकते, जेणे करून वाचकाला आपण कोणत्या कथेचा कितवा भाग वाचत आहोत हे सहज कळू शकते.
Out of 99% there should always remain 1% , because 1% always helps to reach the excellence.
*हा ब्लॉग फक्त एक Review आहे. ब्लॉग
लेखक/लेखिकेला संबंधित ब्लॉग वरील माहिती प्रदर्शित करायची नसल्यास कृपया
Comment द्वारा सांगा, तो ब्लॉग Review हटवण्यात यईल.
नमस्कार, माझ्या ब्लॉगची समीक्षा केल्याची माहिती मला आज गुगल सर्च करता करता मिळाली. धन्यवाद. माझ्या ब्लॉगची लिंक http://mogaraaphulalaa.blogspot.com अशी जर आपण लेखामध्ये बदलून घेतलीत तर या पोस्टच्या वाचकांना योग्य लिंकवर जाऊन माझ्या कथा वाचता येतील.
ReplyDelete