May 21, 2014

Crane Bedi Offical Blog

 Crane Bedi

 " It's Always Possible "

हे घोषवाक्य असलेल्या, धाडसी, कर्तबगार, इमानदार, कर्तव्यपरायण डॉ. किरण बेदीभारतीय पोलिस सेवा (IPS) प्रथम वरिष्ठ महिला अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्या. डॉ. किरण बेदी भारतीय पोलिस सेवे मध्ये पोलिस महानिर्देशक (Bureau of Police Research and Development ) म्हणून पोहोचणारी पहिली, एकमात्र भारतीय महिला आहे. पोलिस खात्यातील अनेक महत्वाची आणि जिकरिचि पदे सांभाळण्याचा मान किरण बेदींना अनेकदा मिळाला आहे. त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या अतिशय कुशलतेने पेलून अनेक सन्मान त्यांनी मिळवले आहेत.
काही प्रमुख पदांचा आलेख
  • दिल्ली ट्राफिक पुलिस चीफ,
  • नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो,
  • डेप्युटी इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस,
  • मिज़ोरम, इंस्पेक्टर जनरल ऑफ प्रिझन,
  • तिहार, स्पेशल सेक्रेटेरी टू लेफ्टनन्ट गव्हर्नर,
  • दिल्ली, इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस,
  • चंडीगढ़, जोइंट कमिशनर ऑफ पुलिस ट्रेनिंग,
  • स्पेशल कमिशनर ऑफ पुलिस इंटेलिजेन्स,
  • यू.एन. सिविलियन पुलिस एड्वाइजर,
  • महानिदेशक, होम गार्ड व नागरिक रक्षा
उलेख्खनीय  सन्मान
    • प्रेसीडेंट गेलेट्री अवार्ड (1979)
    • इटली, वीमेन ऑफ दी ईयर अवार्ड (1980),
    • महिला शिरोमणि अवार्ड (1995)
    • प्राइड ऑफ इंडिया (1999)
    • मदर टेरेसा मेमोरियल नेशनल अवार्ड (2005)

    May 20, 2014

    L.K.Advani's Offical Blog

    Bharatiya Janta Party - Mr.L.K.Advani

    "मेरा देश मेरा जीवन - श्री. लालकृष्ण अडवाणी"
    भारतीय  इतिहासातील एक अभूतपूर्व घटना जीने फक्त भारतच नाही, तर सर्व भारतीय आणि इतर अनेक  देश थक्क झाले. ते म्हणजे 2014 लोकसभा मतदान. भारतीय जनता पक्ष, श्री.  लाल कृष्ण अडवाणी आणि भारताचे खंबीर नेतृत्व करणारे श्री. नरेंद्र मोदी  ह्यांचा ऐतिहासिक विजयगाथेची मुहूतर्मेढ रोवली गेली आणि खऱ्या अर्थानी काँग्रेस मुक्त भारत बघायला मिळाला. 282 खासदार निवडून आले. एवढ मोठं यश हे खरच कौतुकास्पद आहे. त्यामुळे सुरवातीलाच ह्या अद्वितीय यशाबद्दल श्री. नरेंद्र मोदी आणि संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभचिंतन.
    भारतीय जनता पक्षाच्या नव्या उभारी प्रमाणेच आपला Blog Of The Day - India  हि आज नाव्यानी उभारी घेत आहे. तेव्हा सर्वांसाठी प्रेरणास्थान असलेल्या भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते श्री लाल कृष्ण अडवाणी ह्यांच्या ब्लॉग विषयी माहिती देवून सुरुवात करणे योग्य ठरेल.
    अतिशय साधी- सरळ राहणी असलेल्या श्री लाल कृष्ण अडवाणी ह्यांनी ह्या इंटरनेट सारख्या माध्यमाशी आपलं सुत जुळवून हा ब्लॉगचा श्री गणेशा केला. तो त्यांच्याच शब्दात वाचायला छान वाटेल. 
    My young colleagues who have created this website told me that a political portal without a blog is like a letter without a signature. My philosophy in this matter is simple: anything that works, deserves to be welcomed - Mr. L.K.Advani 
    आणि शब्दांना विचारांचे माध्यम बनवून ते जनतेशी आजवर संवाद साधत आहेत.

    May 19, 2014

    पुनश्च भेट..!!

    एका मोठ्या मध्यांतरानंतर Blog Of The Day - India पुनश्च वाचकांच्या भेटीला येत आहे.

    blogoftheday-india.blogspot.in


    सर्वप्रथम, Blog Of The Day - India च्या सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार. आपला प्रतिसाद आणि आपले प्रेम आम्हाला मिळाले आणि तो प्रतिसाद आम्हाला एक नव्या उमेदीने हा प्रवास पुढे असाच चालवा ह्यासाठी

    August 17, 2012

    संस्कृत सुभाषिते [अर्थासकट]

    Subhashite_Milind Divekar














    जलबिंदूनिपातेन क्रमशः पूर्यते घटः |
    स हेतुः सर्वविद्याना धर्मस्य च धनस्य च ||
    अर्थ ›› पाण्याच्या थेंबाथेंबाने हळूहळू घट भरतो त्याचप्रमाणे सर्व विद्या, धर्म आणि धनाच्या बाबतीत आहे. 

     आणि हेच तत्व संग्रहाच्या बाबतीत पण लागू ठरते. संस्कृत भाषा, जी आपल्याला आपली परंपरा शिकवते, आपली संस्कृती शिकवते तीच भाषा आजच्या युगात लोप पावत आहे. संस्कृत भाषेनी आपल्याला अनेक रचना दिल्यात ज्याच्या फलस्वरूप अनेक पौराणिक ग्रंथ तयार झाले. तशीच अनेक सुभाषिते हि दिली. असाच एक संस्कृत ब्लॉग पण समजेल अश्या मराठी भाषेत मिलिंद दिवेकर ह्यांनी सादर केला आहे. संस्कृत सुभाषिते [अर्थासकट] संस्कृत आणि मराठी ह्या दोन भाषेंचा संगम ह्या ब्लॉग वाचताना अनुभवता यईल.

    August 16, 2012

    खगोल विश्व

    khagolvishwa_Sagar Bhandare














    संपूर्ण मानवसृष्टी पृथ्वीवर वसलेली आहे. पृथ्वी जीवसृष्टीच्या विकासातील एक महत्वाचा घटक तर आहेच, पण ह्या शिवाय आपल्या सूर्यमालिकेतील सूर्य, चंद्र, शुक्र, बुध आणि इतर ग्रह, तारे, उपग्रह इ. सृष्टी निर्मितीचे बांधील घटक आहेत, म्हणजेच ह्या सर्वांचा एकत्रित प्रभाव हा आपल्या मानवीय जीवसृष्टीवर होत असतो. हे खगोलशास्त्राद्वारे आपण जाणून घेऊ शकतो. असाच एक खगोल विश्वावर शास्त्रीय दृष्टीकोनातून प्रकाशझोत टाकणारा, सागर भंडारे ह्यांचा ब्लॉग खगोल विश्व.