August 16, 2012

खगोल विश्व

khagolvishwa_Sagar Bhandare














संपूर्ण मानवसृष्टी पृथ्वीवर वसलेली आहे. पृथ्वी जीवसृष्टीच्या विकासातील एक महत्वाचा घटक तर आहेच, पण ह्या शिवाय आपल्या सूर्यमालिकेतील सूर्य, चंद्र, शुक्र, बुध आणि इतर ग्रह, तारे, उपग्रह इ. सृष्टी निर्मितीचे बांधील घटक आहेत, म्हणजेच ह्या सर्वांचा एकत्रित प्रभाव हा आपल्या मानवीय जीवसृष्टीवर होत असतो. हे खगोलशास्त्राद्वारे आपण जाणून घेऊ शकतो. असाच एक खगोल विश्वावर शास्त्रीय दृष्टीकोनातून प्रकाशझोत टाकणारा, सागर भंडारे ह्यांचा ब्लॉग खगोल विश्व.
ब्लॉगचे वैशिष्ठे -
  • खगोल विश्व आणि त्याची माहिती देणारा हा ब्लॉग 2007 साली सुरु झाला आहे.
  • खगोल ह्या विषयातील कुतूहल शास्त्रीय दृष्टीक्षेपातून पण सोप्या भाषेत सर्वांपर्येन्त पोहचवण्याचा प्रयास, सागर ह्यांनी ब्लॉग माध्यमातून केल आहे.
  • अंतरीक्ष-चालू घडामोडी आणि त्यामागची शास्त्रीय कारणमीमांसा, उत्तम सादर केली गेली आहे.
  • खगोल विषयातील रुची असणाऱ्या सर्वांनाच नव्हे तर, आपल्या सारख्या चिकित्सक व्यक्तीला देखीलं बर्याच नवीन गोष्टींची माहिती मिळू शकते.
  • आकाशगंगा, सुर्याग्रहणाचे प्रकार, नक्षत्रे, श्वेत बटू, नेब्युला, पिन-व्हील, तारे ह्यांच्या विषयी रोचक माहिती वाचायला मिळेल.
ब्लॉग लेखकलेखिका - सागर भंडारे.
ब्लॉग अधिकृत URL - http://khagolvishwa.blogspot.com/
आकाशगंगा, चंद्र, सूर्य, तारे आणि ग्रह मानवासाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र ठरलेले आहे. त्यात लपलेले गूढ, त्याची निर्मिती ह्यांचा शोध घेणं आणि त्या सर्व गोष्टींचा, बदलांचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम अभ्यासाने, आपल्याला नेहमीच भुरळ घालत आलेले आहे. चला मग,  खगोल विश्व ह्या ब्लॉग सोबत खगोल-भ्रमंती करून जाणून घेऊ हे खगोलशास्त्र. 

  *हा ब्लॉग फक्त एक Review आहे. ब्लॉग लेखक/लेखिकेला संबंधित ब्लॉग वरील माहिती प्रदर्शित करायची नसल्यास कृपया Comment द्वारा सांगा, तो ब्लॉग Review हटवण्यात यईल.

No comments:

Post a Comment