August 17, 2012

संस्कृत सुभाषिते [अर्थासकट]

Subhashite_Milind Divekar














जलबिंदूनिपातेन क्रमशः पूर्यते घटः |
स हेतुः सर्वविद्याना धर्मस्य च धनस्य च ||
अर्थ ›› पाण्याच्या थेंबाथेंबाने हळूहळू घट भरतो त्याचप्रमाणे सर्व विद्या, धर्म आणि धनाच्या बाबतीत आहे. 

 आणि हेच तत्व संग्रहाच्या बाबतीत पण लागू ठरते. संस्कृत भाषा, जी आपल्याला आपली परंपरा शिकवते, आपली संस्कृती शिकवते तीच भाषा आजच्या युगात लोप पावत आहे. संस्कृत भाषेनी आपल्याला अनेक रचना दिल्यात ज्याच्या फलस्वरूप अनेक पौराणिक ग्रंथ तयार झाले. तशीच अनेक सुभाषिते हि दिली. असाच एक संस्कृत ब्लॉग पण समजेल अश्या मराठी भाषेत मिलिंद दिवेकर ह्यांनी सादर केला आहे. संस्कृत सुभाषिते [अर्थासकट] संस्कृत आणि मराठी ह्या दोन भाषेंचा संगम ह्या ब्लॉग वाचताना अनुभवता यईल.

ब्लॉगचे वैशिष्ठे -
  • 2010 साली संस्कृत सुभाषिते [अर्थासकट]  हा ब्लॉग सुरु झाला आहे.
  • 750 पेक्षा जास्त सुभाषिते मराठी अर्थासकट इथे वाचायला मिळतील.
  • मिलिंद दिवेकर ह्यांनी सौ.मंगला केळकर ह्यांच्या कडून सुभाषितांचा अर्थ समजून घेऊन , ब्लॉगद्वारा हि सुभाषिते संग्रहित केली आहेत.
  • सुभाषितांच्या अनुक्रमणिकेत अद्याक्षरावरून सुभाषितांचा आनंद घेता येईल.
  • Search करूनही सुभाषित शोधता येऊ शकते.
  • सुभाषितांच्या ह्या संग्रहाला आपण देखील E-mail द्वारा मिलिंद दिवेकर ह्यांना सुभाषिते पाठवू शकतो.
ब्लॉग लेखकलेखिका - मिलिंद दिवेकर.
ब्लॉग अधिकृत URLhttp://subhashite.blogspot.com
संस्कृत भाषेने आपल्याला सुभाषितांसारखे मोती दिले ज्यांच्या अर्थाची साठवण अनमोल आहे. आपल्या पुढच्या पिढीलाही हि सुभाषितांची संपन्न श्रेणी माहिती झाली तर संस्कार वर्गांची गरज भासणार नाही. जे उपजत आहे आज ते वर्गात शिकावे लागतंय हेच खरं दुर्दैव. फक्त त्या उपजताची जाणीव होणे महत्वाचे आहे. मग आपणही भेट देऊ ह्या संस्कृत सुभाषिते [अर्थासकट] ब्लॉगला आणि हा मौतिकसंचय भावी पिढीसाठी जतन करू. 

  *हा ब्लॉग फक्त एक Review आहे. ब्लॉग लेखक/लेखिकेला संबंधित ब्लॉग वरील माहिती प्रदर्शित करायची नसल्यास कृपया Comment द्वारा सांगा, तो ब्लॉग Review हटवण्यात यईल.

No comments:

Post a Comment