May 20, 2014

L.K.Advani's Offical Blog

Bharatiya Janta Party - Mr.L.K.Advani

"मेरा देश मेरा जीवन - श्री. लालकृष्ण अडवाणी"
भारतीय  इतिहासातील एक अभूतपूर्व घटना जीने फक्त भारतच नाही, तर सर्व भारतीय आणि इतर अनेक  देश थक्क झाले. ते म्हणजे 2014 लोकसभा मतदान. भारतीय जनता पक्ष, श्री.  लाल कृष्ण अडवाणी आणि भारताचे खंबीर नेतृत्व करणारे श्री. नरेंद्र मोदी  ह्यांचा ऐतिहासिक विजयगाथेची मुहूतर्मेढ रोवली गेली आणि खऱ्या अर्थानी काँग्रेस मुक्त भारत बघायला मिळाला. 282 खासदार निवडून आले. एवढ मोठं यश हे खरच कौतुकास्पद आहे. त्यामुळे सुरवातीलाच ह्या अद्वितीय यशाबद्दल श्री. नरेंद्र मोदी आणि संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभचिंतन.
भारतीय जनता पक्षाच्या नव्या उभारी प्रमाणेच आपला Blog Of The Day - India  हि आज नाव्यानी उभारी घेत आहे. तेव्हा सर्वांसाठी प्रेरणास्थान असलेल्या भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते श्री लाल कृष्ण अडवाणी ह्यांच्या ब्लॉग विषयी माहिती देवून सुरुवात करणे योग्य ठरेल.
अतिशय साधी- सरळ राहणी असलेल्या श्री लाल कृष्ण अडवाणी ह्यांनी ह्या इंटरनेट सारख्या माध्यमाशी आपलं सुत जुळवून हा ब्लॉगचा श्री गणेशा केला. तो त्यांच्याच शब्दात वाचायला छान वाटेल. 
My young colleagues who have created this website told me that a political portal without a blog is like a letter without a signature. My philosophy in this matter is simple: anything that works, deserves to be welcomed - Mr. L.K.Advani 
आणि शब्दांना विचारांचे माध्यम बनवून ते जनतेशी आजवर संवाद साधत आहेत.
ब्लॉगचे वैशिष्ठे -
  • 2009 साली L.K.Advani's Blog हा ब्लॉग सुरु झाला आहे.
  • आपल्याला ह्या Blog वरचे विचार दोन भाषांमध्ये वाचायला मिळतील. हिंदी / English
  • अतिशय समर्पक शब्दात लिहिलेल्या जळजळीत Posts आपल्याला विचार करायला लावतात.
  • राजकारण, समाजकारण आणि भारतावर प्रेम असेल्या सर्वांनाच भारतीय जनता पक्षाचा आणि त्यातील श्री अडवाणींच्या भूमिकेचा आढावा इथे मिळू शकेल.
  • मोदी  जी आणि अडवाणी जी ह्यांच्या एकत्रित ताकद दाखवून देणारी Vibrant Gujrat हि Post  वाचण्यासारखी आहे. 
  •  L.K.Advani's Blog ब्लॉगमध्ये  Wisdom Soup for the Poll मध्ये श्री. अडवाणी जींची राजनैतिक विचारधारा आणि त्यासाठी त्यांचासाठी आवश्यक बुद्धिवाद ते इथे मांडतात.
  • RSS Feeds मधून आपल्याला त्यांच्या नवीन लेखनाच्या नोंदी (Feeds) मिळत राहतील.
ब्लॉग लेखकलेखिका - श्री लालकृष्ण अडवाणी.
ब्लॉग भाषा पर्याय - मराठी / हिंदी / English
 ब्लॉग अधिकृत URLhttp://blog.lkadvani.in/
मजबूत सिद्धांतावर आधारित बौद्धिक क्षमतेची घट्ट वीण, लेखणीला आणि वाणीला  "राष्ट्रवादाची" तीक्ष्ण धार असलेले, आढळ व्यक्तिमत्व, जे पारिवारिक नात्यांशीही तितकीच जोडलेली आहे. असे हे अनुभवी, अभ्यासू आणि सर्वांचे प्रेरणास्थान असलेले श्री लाल कृष्ण अडवाणी जी त्यांचे विचार त्यांच्या शैलीत L.K.Advani's Blog वर मांडतात.

  *हा ब्लॉग फक्त एक Review आहे. ब्लॉग लेखक/लेखिकेला संबंधित ब्लॉग वरील माहिती प्रदर्शित करायची नसल्यास कृपया Comment द्वारा सांगा, तो ब्लॉग Review हटवण्यात यईल.

No comments:

Post a Comment