August 07, 2012
August 06, 2012
पोलिसनामा
समाजामध्ये वाढत असलेले गुन्हे, गुन्हेगार ह्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक महत्वाची कडी असते पोलीस-यंत्रणा. वेळोवेळी वृतपत्र, संगणक, दूरदर्शन माध्यमातून अनेक माहिती-साधने आपल्याला ह्या पोलीस-यंत्रणेशी आमने-सामने करून देतातच. हि झाली नाण्याची एक बाजू, पण ह्याच नाण्याची दुसरी बाजू, जी आपल्या समोर क्वचितच येते तीच बाजू विजयसिंह होलम ह्यांच्या पोलिसनामा ह्या ब्लॉगमधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
August 03, 2012
मोगरा फुलला
कथा ह्या माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक म्हंटला तर अतिशोयोक्ती होणार नाही, कदाचित.. कारण एक काळ होता, जेव्हा pocket - money मधले पैसे वाचवून लायब्ररी लावायची आणि कथा- कादंबऱ्या पिजून काढायच्या. कधी पौराणिक, कधी सामाजिक, कधी suspense- thrill. ह्याच कथा आपल्याला घडवत असतात. कथा - कादंबरी मध्ये वाचलेले नायक, नायिका, इतर पात्र इतकच काय पण काही प्रसंग हि आपल्याला आपलेसे करणारा हा ललित साहित्याचा एक प्रकार आहे. मग अश्या कथा - कादंबरी ह्या ई - युगात कुठे ? असा प्रश्न आपल्याला सहज पडू शकतो. पण नाही, कांचन कराई ह्यांचा मोगरा फुलला हा ब्लॉग कथाप्रेमी वाचकांसाठी कथासंग्रह उपलब्ध करतो.
August 02, 2012
बालभारती - मराठी कविता
आनंदी आनंद गडे,
इकडे-तिकडे चोहीकडे...
अ अ आई , म म मका
मी तुझा मामा , दे मला मुका... August 01, 2012
Subscribe to:
Posts (Atom)




