August 14, 2012

अग्निसखा

Agnisakha_Kranti


फिनिक्स, एक असा पक्षी जो त्या तेजस्वी सुर्यावर प्रेम करतो आणि आकाशात झेप घेतो, उंच..उंच.. अजून उंच.. पण सूर्याच्या प्रखर तेजाची झळ त्याचे नाजूक पंख सोसू शकत नाही. ज्याच्या सहाय्याने आज तो इतक्या उंच पोहोचला होता, त्याच पंखांच्या राखेत निपचित पडून राहतो हा. वाट पाहतो, पुन्हा आकाशात क्षेप घेण्याची. स्वतःच्या पंखाच्या राखेतून पुन्हा आसमंतात झेपावणारा हा अग्निसखा आणि तसाच क्रांती ह्यांचा कवितांचा ब्लॉग अग्निसखा. एक आशावादी, उत्स्फुर्त ब्लॉग.

ब्लॉगचे वैशिष्ठे -
  • अनेक कवितांचा नजराणा घेऊन हा ब्लॉग 2009 ला क्रांती ह्यांनी पेश केला.
  • अनुवाद, कविता, गझल, चारोळ्या, आठोल्या अश्या अनेक कवितांची रेलचेल ह्या ब्लॉग वर बघायला मिळेल.
  • अग्निसखा  मधील सर्व कविता, क्रांती ह्यांच्या स्वरचित आहेत. ह्या कवितांमध्ये विविध विषय हाताळलेल दिसतात.
  • ब्लॉगची मांडणी साधी असली तरी कवितांचा गोडवा ब्लॉगला उत्तम साथ देतो.
  • वर्गवारी नुसार कवितांचा आलेख पाहता येतो.
ब्लॉग लेखकलेखिका - क्रांती.
ब्लॉग अधिकृत URL - http://agnisakha.blogspot.com
लावणी, भारुड, गझल, अनुवाद, चारोळी, जोगवा सर्वांनाच एक हलकीशी शब्दांची गुंफण मिळाली आहे. क्रांती ह्यांनी गुंफलेल्या ह्या शब्द-रचना नक्कीच वाचण्यासारख्या आहेत. अग्निसखा, निव्वळ कवितांचा आस्वाद घ्यायचा असेल तरी नक्की ह्या ब्लॉगला भेट द्या.

  *हा ब्लॉग फक्त एक Review आहे. ब्लॉग लेखक/लेखिकेला संबंधित ब्लॉग वरील माहिती प्रदर्शित करायची नसल्यास कृपया Comment द्वारा सांगा, तो ब्लॉग Review हटवण्यात यईल.

No comments:

Post a Comment