August 10, 2012

Calligraphic Expressions....

Calligraphic Expression_B.G.Limaye














अक्षरांचे भाव अचूक टिपणं हि देखील एक कला आहे. प्रत्येक अक्षराचा एक भाव असतो. त्या अक्षराचा भाव समजून निर्माण होते ती अक्षराची भावना. आणि मग काय, अक्षरेच बोलू लागतात आपल्याशी. कविता, उतारे ह्यांच्या साक्षीने साकारलेली, त्या अक्षरांमधल्या वेगवेगळ्या भावनांची लयबद्ध मांडणी श्री. लिमये ह्यांच्या Calligraphic Expressions...by B G Limaye ह्या ब्लॉग मधून दिसते.
ब्लॉगचे वैशिष्ठे -
  • A Calligraphy A day ह्या ब्लॉगची प्रेरणा घेऊन Calligraphic Expressions...by B G Limaye हा ब्लॉग 26 जानेवारी, 2012 ला सुरु झालेला आहे.
  • हा ब्लॉग नुकताच सुरु झाला असला तरी, दररोज एक असे अनेक Calligraphy चे उत्कृष्ट नमुने इथे  बघायला मिळतील.
  • प्रत्येक अक्षरचित्र हे कवींच्या कवितेमधून किंवा लेखकाच्या लेखातून उमटलेल्या भावनांनी सजवलेले असले, तरी लिमये ह्यांनी त्या अक्षरांना जिवंत केले आहे.
  • प्रत्येक कलाकृतीसोबत तिचा योग्य संदर्भ वाचायला मिळतो. 
ब्लॉग लेखकलेखिका - B G Limaye.
ब्लॉग अधिकृत URL - http://calligraphicexpressions.blogspot.com/
अक्षरांशी खेळून काव्यातल्या भावना जागृत करण्याचा हा लिमये ह्यांचा प्रयत्न आपल्या सारख्या रसिकांना नक्कीच सुखावून जातो. त्यांनी प्रत्येक अक्षराला दिलेल्या स्वतंत्र ताकदीमुळे वाचक नक्कीच Calligraphic Expressions...by B G Limaye ह्या ब्लॉग वर घुटमळत राहतो. मग चला अक्षरांशीही मैत्री करू.

  *हा ब्लॉग फक्त एक Review आहे. ब्लॉग लेखक/लेखिकेला संबंधित ब्लॉग वरील माहिती प्रदर्शित करायची नसल्यास कृपया Comment द्वारा सांगा, तो ब्लॉग Review हटवण्यात यईल.

No comments:

Post a Comment