August 07, 2012

पु.ल.प्रेम


Pula Prem_Deepak


व्यथा असो आनंद असू दे
प्रकाश  किंवा तिमिर असू दे
वाट दिसो अथवा न दिसू दे , गात पुढे मज जाणे
माझे जीवन गाणे....

पु.ल.देशपांडे.. एक असे आगळे- वेगळे बहुरंगी व्यक्तीमत्व. तरी पण साधेच, आपले वाटणारे व्यक्तीमत्व. आपुलकी ने माझे जीवन गाणे म्हणत-म्हणत बटाट्याच्या चाळीतून हळूच डोकावताना अनेक व्यक्ती आणि वल्लींच्या नसत्या उठाठेवी, अपूर्वाई ने पाहून असा मी असामी म्हणणारा गुळाचा गणपती म्हणजेच मिश्कील भाई-काका (पु.ल.) हे म्हणजे साहित्याचा जिवंत झरा, जो आजही आपल्याला सुखावतोय. पु. ल. देशपांडे ह्यांची साहित्यावणी, दिपक ह्यांच्या पु.ल.प्रेम ह्या ब्लॉग द्वारा संग्रहित केली आहे.
ब्लॉगचे वैशिष्ठे -
  • ह्या ब्लॉगवर आपल्याला पु.ल.देशपांडे ह्यांचे कथाकथन, गोष्टी, नाटके ऐकायला मिळतील.
  • पु.ल.देशपांडेंच्या जीवनातले निवडक प्रसंग 'पुलकित' ह्या विभागात वाचायला मिळतील.
  • 'आठवणीतले पु.ल' ह्या विभागात पु.ल.देशपांडे ह्यांच्यावरील अनेक इतर लेख वाचता येतील.
  • 'चाहत्यांचे पु.ल' ह्या विभागात चाहत्यांच्या नजरेतून पु.ल.देशपांडें ह्यांना अनुभवता येईल.
  • 'सुनिता ताईंच्या लेखणीतून' ह्या विभागात सुनिता ताई ह्यांचे उत्कृष्ट लिखाण वाचायला मिळते. इथे त्यांचे आणि पु.ल.देशपांडे ह्यांच्या जीवनाच्या पैलूंचे दर्शन घडते.
  • ह्यांच्या व्यतिरिक्त असा मी असामी, व्यक्ती आणि वल्ली, अपूर्वाई, बटाट्याची चाळ, पूर्वरंग, खिल्ली, खोगीरभरती, मैत्र आणि अघळपघळ मधील निवडक उतारे वाचायला मिळतील.
  • पु.ल.देशपांडे ह्यांच्या जुन्या छायाचित्रांचा slide-show आणि चित्रफिती हि बघायला मिळू शकतात.
  • पु.ल.देशपांडे ह्यांच्या काही ध्वनिफिती आपण ऐकू शकतो तसेच त्या Download हि करता येतील.
  • पु.ल.देशपांडे ह्यांच्या कविता देखील इथे वाचायला मिळतील. 
  • पु.ल.देशपांडे ह्यांचे चाहते, पु.ल.देशपांडे ह्यांची पुस्तके Online खरेदी करून 'पु.ल.देशपांडे फौंडेशन' ला मदद करू शकतात. Online पुस्तक खरेदीसाठी बाह्य दुवे दिले आहेत.  
ब्लॉग लेखकलेखिका - दिपक.
ब्लॉग अधिकृत URL - http://cooldeepak.blogspot.com/
पु.ल.देशपांडे तुमच्या सारख्या सर्वगुणसंपन्न कलाकाराला, तेवढ्याच विचारसंपन्न व्यक्तित्वाला आणि आजही आमच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सध्या- सरळ मनाच्या माणसाला हा मानाचा मुजरा. पु.ल.देशपांडे ह्यांच्या  पु.ल.प्रेम ह्या स्मृती-संग्रहाला अवश्य भेट द्या.

  *हा ब्लॉग फक्त एक Review आहे. ब्लॉग लेखक/लेखिकेला संबंधित ब्लॉग वरील माहिती प्रदर्शित करायची नसल्यास कृपया Comment द्वारा सांगा, तो ब्लॉग Review हटवण्यात यईल.

No comments:

Post a Comment