August 09, 2012

अर्पण (श्री दत्तगुरू)

Arpan_Shri Dattaguru


|| ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभय नमः ||

आज गुरुवार, श्री दत्तगुरूंच्या कृपेनी सुरु झालेला हा मराठी ब्लॉग अर्पण, दत्तभक्तांसाठी एक पर्वणीच ठरू शकेल. दत्तगुरूंच्या अनेक लीलांचे दर्शन शब्दरूपानी ह्या ब्लॉगवर संग्रहित केलेले आहे.
ब्लॉगचे वैशिष्ठे -
  • श्री दत्तगुरूंची विचारधारा, सामाजिक बोध, अवतार ह्यांची माहिती ह्या ब्लॉग वर मिळू शकेल.
  • मूलतः श्री दत्तगुरुंवरील मराठी दुवे तुरळक असल्या कारणाने हा ब्लॉग एक उत्तम वाचनासाठी स्त्रोत होऊ शकतो.
  • हा ब्लॉग श्री दत्तमहात्म्य, ओवी, श्री दत्तनामावली, श्री दत्तांचे निसर्गसाक्षी २४ गुरु अश्या अनेक अलौकिक माहितीने पुलकित झालेला आहे.
  • श्री गुरुचरित्र अध्याय दत्तभक्तांना रोज वाचायला मिळू शकतात.
  • दत्त भक्तांसाठी बरीच माहिती ह्या ब्लॉगवर वाचायला मिळू शकते..
ब्लॉग लेखकलेखिका - अज्ञात.
ब्लॉग अधिकृत URL - http://dattaguru.myarpan.in/
Online दत्तदर्शनाचा हा लाभ मी घेतला, आपणही जरूर घ्या अर्पण ब्लॉग वर. 

सर्वांनी यावे, दत्तमयी व्हावे,
हर्षाने मन ओथंबून जावे..
दर्शन घेता त्या दत्तरूपाचे,
सुखं समाधान चित्ती उरावे..
श्री गुरुदेव दत्त..

  *हा ब्लॉग फक्त एक Review आहे. ब्लॉग लेखक/लेखिकेला संबंधित ब्लॉग वरील माहिती प्रदर्शित करायची नसल्यास कृपया Comment द्वारा सांगा, तो ब्लॉग Review हटवण्यात यईल.

No comments:

Post a Comment