August 02, 2012

बालभारती - मराठी कविता
आनंदी आनंद गडे,
इकडे-तिकडे चोहीकडे... 
अ अ आई , म म मका 
मी तुझा मामा , दे मला मुका...

आठवलं.. ?? बालभारती ह्या पुस्तकातली एक कविता. हि आणि अश्या अनेक कविता आपल्याला पुन्हा मागे नेतात, त्या बालपणीच्या रम्य जगात. ह्या कवितांशी जडलेलं आपलं शालेय नातं आठवल्याखेरीज राहत नाही. त्या कविता पाठ करणे, पाठ  करता करता चुकणे,  इतकाच काय तर त्या कविता पाठ होत नाही म्हणून खाल्लेले धम्मक लाडू देखील आठवतात. आपले ते बालपणीचे हरवलेले क्षण सुरेश शिरोडकर ह्यांच्या  बालभारती - मराठी कविता  ह्या ब्लॉगने जपण्याचा सुंदर प्रयास केला आहे.

ब्लॉगचे वैशिष्ठे -
 • पाचशे हून अधिक कवितांचा संग्रह सुरेश शिरोडकर ह्यांनी एकत्रित सदर केला आहे.
 • कवी, कवियत्रींच्या वर्गवारीनुसार देखील कविता वाचायला मिळतील.
 • शिवाय निवडक कवींचा अल्प  परिचय हि वाचायला मिळेल.
 • अनुक्रमणिकेत अद्याक्षरावरून कविता सहज सापडू शकते.
 • बालभारती, कुमारभारती, युवकभारती ह्या शालेय पाठ्यपुस्तकातील जवळजवळ सर्व कवितांचा संग्रह आपल्याला वाचायला मिळेल.
 • हा ब्लोग पूर्णपणे एक साठवण असल्यानी copy - paste अथवा कोणत्याही प्रकारच्या पुनर्मुद्रणास सक्त मनाई आहे.
ब्लॉग लेखक/ लेखिका - सुरेश शिरोडकर
ब्लॉग अधिकृत URL - http://balbharatikavita.blogspot.in
सुरेश शिरोडकर ह्यांच्या ह्या मराठी कवितांच्या संग्रहाची नोंद लोकसत्ता, मुंबई वृतांत तसेच महाराष्ट्र टाईम्स ह्या वृत्तपत्रांनी घेतली आहे. चला मग, एक सफर बालभारती कवितांच्या सोबत करायला. 

झुक - झुक - झुक - झुक आगीनगाडी 
धुरांच्या रेषा हवेत काढी 
कविता, गाणी वाचूया 
बालभारतीला भेट देऊया  

 *हा ब्लॉग फक्त एक Review आहे. ब्लॉग लेखक/लेखिकेला संबंधित ब्लॉग वरील माहिती प्रदर्शित करायची नसल्यास कृपया Comment द्वारा सांगा, तो ब्लॉग Review हटवण्यात यईल.

5 comments:

 1. the given blog link is not working pls help with the same or send new link

  ReplyDelete
  Replies
  1. The link for this Blog is updated.. kindly check it and enjoy the Blog Of The Day..

   Delete
 2. kavita pramanech purviche dhade hi sasmarniya hote te nahi ka vachayala bhettil astil tar link milali tar bar hoieel

  ReplyDelete
 3. The new link of the Blog is;
  http://balbharatikavita.blogspot.in

  ReplyDelete
  Replies
  1. Thanks @Suresh Shirodkar for giving the right link..!! I have made changes hope you liked the article, If yes please share the link http://blogoftheday-india.blogspot.in to grow..
   Regards.

   Delete