August 06, 2012

पोलिसनामा

Policenama_Vijaysinha Holam


समाजामध्ये वाढत असलेले गुन्हे, गुन्हेगार ह्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक महत्वाची कडी असते पोलीस-यंत्रणा. वेळोवेळी वृतपत्र, संगणक, दूरदर्शन माध्यमातून अनेक माहिती-साधने आपल्याला ह्या पोलीस-यंत्रणेशी आमने-सामने करून देतातच. हि झाली नाण्याची एक बाजू, पण ह्याच नाण्याची दुसरी बाजू, जी आपल्या समोर क्वचितच येते तीच बाजू विजयसिंह होलम ह्यांच्या पोलिसनामा ह्या ब्लॉगमधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

ब्लॉगचे वैशिष्ठे -
  • स्वतः बातमीदार म्हणून कार्यरत असल्याने, बातमी मागील सत्यता लोकांपुढे ठेवण्यासाठी, विजयसिंह होलम ह्यांनी पोलिसनामा हा ब्लॉग 2009 साली सुरु केला.
  • ह्या ब्लॉगवर आपल्याला चालू घडामोडी, पडद्यामागची पोलिसांची तसेच सरकारची भूमिका आणि कागदावर राहिलेले कायदे ह्यांचे विवरण बघायला मिळेल.
  • सध्याचे वाढते गुन्हे आणि त्यापासून सामान्यांना आपला बचाव कसा करता येईल ह्या संबंधीची माहिती इथे वाचायला मिळेल.
  • ह्या ब्लॉगवर आपल्याला रोजच्या वापरातल्या अतिशय साध्या पण महत्वाच्या असलेल्या टिप्सहि वाचयला मिळतील. ह्या टिप्स आपल्यासोबत होणाऱ्या आघाटीतापासून पूर्व बचावासाठी उपयुक्त ठरतात.
  • घराबाहेर पडताना, प्रवासात, सार्वजनिक ठिकाणी घ्यायची दक्षता सर्वांनीच वाचावी आणि अंगी बाणावी अशी आहे. 
  • कायदा आणि सुव्यवस्था काय आहे, ह्यांची माहिती पोलिसनामा च्या विविध लेखांतून वाचायला मिळू शकते.  
ब्लॉग लेखकलेखिकाविजयसिंह होलम.
ब्लॉग अधिकृत URL - http://policenama.blogspot.com/
गुन्हा, गुन्हेगार ह्यांच्यावर आपले नियंत्रण राहू शकत नाही, पण हो, जागरूक राहणे आणि सतर्कतेने वागणे हा आपल्या सर्वांचा मुलभूत अधिकार नक्कीच आहे. तेव्हा समाजातल्या विविध घटनांकडे, कायद्यांकडे डोळसपणे बघून ते समजून घेणे, काळाची गरज बनले आहेत. मग वेळ कशाला? आजच भेट देऊया विजयसिंह होलम ह्यांच्या पोलिसनामा ब्लॉगला.

  *हा ब्लॉग फक्त एक Review आहे. ब्लॉग लेखक/लेखिकेला संबंधित ब्लॉग वरील माहिती प्रदर्शित करायची नसल्यास कृपया Comment द्वारा सांगा, तो ब्लॉग Review हटवण्यात यईल.

No comments:

Post a Comment