August 13, 2012

मराठी संगीत प्रेमी

Marathi Sangeet Premi_Sagar


संगीत.., माणसाच्या जीवनातला एक अविभाज्य घटक. मग ते चित्रपट-संगीत असो किंवा एखाद्या album मधील असो, संगीताची दुनिया आपल्यला नेहमीच मोहून घेते. काळ बदलला तसे संगीतही बदलले. नव्या युगासोबत जाताना नवीन संगीताशी गट्टी करायला हवी, नाही का? त्यासाठी  मराठी संगीत प्रेमी हा ब्लॉग घेऊन सागर येत आहेत नव्या युगातील नवीन संगीताचा नजराणा, खास संगीत प्रेमींसाठी.

ब्लॉगचे वैशिष्ठे -
  • हा ब्लॉग 2010 ला सुरु झालेला असून, संगीतप्रेमींसाठी एक सुरेख पर्वणी आहे.
  • नव्या युगातील गाणी, त्याच्या लिंक्स ह्या ब्लॉग वर सागर वेळोवेळी उपलब्घ करून देतात.
  • ह्या ब्लॉगवर चित्रपट, कवी, संगीतकारांच्या विविध रचना download करता येतील.
  • ब्लॉगची मांडणी करताना त्यात विविध गाण्यांच्या स्वतंत्र लिंक्स download करता येतील अशी रचना आहे.
  • प्रत्येक blog-post मध्ये त्या album मधील किंवा चित्रपटामधील संक्षिप्त माहिती उपलब्ध आहे. जसे, संगीतकार, स्वर, गीते, साल वगेरे.
  • ब्लोगवरील Posts ह्या मुख्य लिंक वर RSS Feeds  उपलब्ध होतील. 
ब्लॉग लेखकलेखिका - सागर.
ब्लॉग अधिकृत URL - http://marathisangeetpremi.blogspot.com/
ब्लॉगची मांडणी चांगली आहे, परंतु ब्लॉगच्या मुख्य लिंक्स (about, login) मध्ये थोड्या त्रुटी जाणवतात. हा ब्लॉग आणि त्यावरील उपलब्ध गाणी आपल्याला नक्कीच आवडतील. नव्या गाण्यांना अनेक लोकांपर्येंत पोहचवण्याचा सागर ह्यांच्या हा मानस नक्कीच सफल व्हावा आणि आपल्यालाहि नवीन गाण्यांचा आनंद घेता यावा यासाठी आजच भेट द्या मराठी संगीत प्रेमी ब्लॉगला.

  *हा ब्लॉग फक्त एक Review आहे. ब्लॉग लेखक/लेखिकेला संबंधित ब्लॉग वरील माहिती प्रदर्शित करायची नसल्यास कृपया Comment द्वारा सांगा, तो ब्लॉग Review हटवण्यात यईल.

No comments:

Post a Comment